जिवनाची गणितं सोडवताना
खुप सारे कष्ट पडतात
इथेच हार न मानणार्यांचे
स्वप्न तिळ तिळ वाढतात
जिद्द ज्यांच्या उरी आसते
ते रोजच नव्या संकटाशी भिडतात
एक एक संकट संपवून
ते यशाची लढाई लढतात
खरच त्यांच्या कर्तुत्वाला
सारे लोक सलाम करतात
प्रगती पथावर चालताना
हे रोजच बाजी मारतात
प्रचंड मेहनतीची ऊर्जा आणि
हे स्वप्नांसाठी कटिबद्ध असतात
यशाच्या लढाईत हे मनातही
आणि रणातही जिंकलेलेच दिसतात
हिच तर त्यांच्या यशाची
खरी खुरी गुपिते असतात
प्रत्येकाने तसेच व्हावे कारण
त्याच्या तुलनेत तुम्हीही कमी नसतात
कवी : ♈विराट शिंदे... 9673797996
©कविता नक्कीच शेअर करा पण कवितेतील कविचे नाव मात्र काढू नये...