Wednesday, 27 July 2016

माझी माय

माझ्या मायेची रं माया
लई आभाळात गत हाई !!
रातं दिस दम नाय
तिच पळतीच काम र्‍हाई !!

माझ्या मायेचीरं पात
सर्वांच्या म्होर म्होर रायी !!
तुकोबांचे अभंग माय
काम करीत करीत गायी !!

माझी माय कष्टकरी
सार्‍या जगाच दुख उरी !!
नाही कधीच शिकायत
माय सार्‍यांसाठी कष्टकरी !!

हर्ष तिच्या रं मनात
कष्ट उपशीती रानात !!
तिच्या कष्टाने  फुलली बाग
जाऊनी पहारे धानात !!

घरी राबराब राबूनी
शेत काम आटपून घेई !!
तिच्या हातात रं जादू
काळ शिवार हिरव होई !!

माझ्या मायेची रं माया
लई आभाळात गत हाई !!
रातं दिस दम नाय
तिच पळतीच काम र्‍हाई !!

✒विराट शिंदे, 9673797996

No comments:

Post a Comment