मन धुंद पाखरांनी
स्वछंदी सैर घ्यावा
गुमनाम या मनाचा
बिनधास्त शोध घ्यावा ||
मद मस्त बाहु ज्याची
बलदंड विर व्हावे
अन धुंद या विजेचा
मन धुंद बोध घ्यावा ||
अवनी प्रेरीत व्हावी
ऐसा शुर-विर व्हावा
शिवबा परी नृप
या जगती पुन्हा व्हावा ||
रण कंद फुंकताना
मणुस होऊन पहावे
स्वयं प्रेरीत रहावे
जगाला प्रेरीत करावे ||
स्वछंदात जगताना या
जिवनात सुंदर बगीचा फुलावी
तेजःपुंज यश शिखरावर
गरूड झेप घ्यावी ||
मन धुंद पाखरांनो
मध मस्त झेप घ्यारे
दिवा स्वप्नास तुम्ही
पुर्तीस घेऊन जारे ||
✒विराट शिंदे (9673797996)
No comments:
Post a Comment