Thursday, 11 February 2016

19 फेब्रुवारी... जगात भारी...

19 फेब्रुवारी... जगात भारी...

आज समतेने ममतेला साद दिली
घडव एक महाराष्ट्राचा वाली
नांदुदे इथे समृद्धी आण खुशाली
मानवतेचे तख्त आहे आजवर खाली

तिच साद जिजाऊंच्या कानी गेली
जिजाऊंनी वाली घडवण्यची प्रतिज्ञा केली
ज्यांची अखिल भुतलावर किर्ती झाली
ती 19 फेब्रुवारी जवळ आली हो आली आली शिवजयंती आली..

- ♈ विराट शिंदे

Tuesday, 9 February 2016

कुठे हरवला माणसा....

कुठे हरवलास माणसा
का सहतोस अपमान असा
हे जग आहे तुज साठी
पण तुच ईथे दिसेनास

तुज विना हे विश्व सारे
मला काही पाहावेना
तूझाच सखा तूझाच सोबती
ईथे त्याला रहवेना

सांग मानसा कसे गावे म्या
या विश्वात तुला कुठे पाहावे म्या
का असा हरवलास
शोध तुझा होईना

थकलोय खुप शोधून मी
आता लाचारीने जगू कसा
कुठे हरवलास मानसा
का सहतोस अपमान असा !!

--विराट शिंद

बेभान या जगात

बेभान जगात मी भानावर आलो
की नाही याही पेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे मि बेभान कसा
या मातीचे उपकार माझ्यावर माला तीने तिच्या कूशित घेतले.
कसे विसरू विसरू या  जगाला जिथे जगणे मि शिकलो
पण आजची लाचारी पाहुन हिरमूसलो मी,
का हा मनवांचा कळप मानुसकी हारपलेला,
का मि असा ऊन्हाच्या झळइत होरपळून निघतो.
म्हणून जगासमोर एकच भिक मागतो
बाबाहो, भावाहो, मानुसपण जपारे सवंगड्यानो...

      ---विराट शिंदे

करमठांनो...

करमठानो जरगटांनो पळा रे पळा,
तुका, शिवबा संपवनार्यांनो
संपला तो जिव्हाळा,
देव भाव विरून गेला रे
विरला थोतांडाचा सापळा
तुमचा काळ संपला आता,
नका दाखवू पुरोगामी लळा !!

करमठानो जरगटांनो पळा रे पळा,
मना मना त जळनार्यांनो
घेतो श्वास मोकळा,
आज्ञानाचा अंधकार पसरवलास बांडगूळा,
पण फुले विद्रोह कळला या सकळा,
कस्तूरी परी गंध  या मातीचा,
तुज न कळला करमठा!!

करमठानो जरगटांनो पळा रे पळा !!!
       विराट शिंदे       9673797996

करमठांनो...

करमठानो जरगटांनो पळा रे पळा,
तुका, शिवबा संपवनार्यांनो
संपला तो जिव्हाळा,
देव भाव विरून गेला रे
विरला थोतांडाचा सापळा
तुमचा काळ संपला आता,
नका दाखवू पुरोगामी लळा !!

करमठानो जरगटांनो पळा रे पळा,
मना मना त जळनार्यांनो
घेतो श्वास मोकळा,
आज्ञानाचा अंधकार पसरवलास बांडगूळा,
पण फुले विद्रोह कळला या सकळा,
कस्तूरी परी गंध  या मातीचा,
तुज न कळला करमठा!!

करमठानो जरगटांनो पळा रे पळा !!!
       विराट शिंदे       9673797996

Thursday, 4 February 2016

ऋतू प्रेमाचा

ऋतू प्रेमाचा आज आहे !
तुझ्याच आठवणी गाते सख्या रे !!
धगधगत्या पोर्णिमेचा चंद्र आण
जिवाड स्वप्नांतला उजेड तू !
बेधुंद जिवनाचा शोर आण मनाला भावनारा मोर तू रे !
ह्रदयात माजलेला जोर आण
जिवाला लागलेला घोर तू रे !
माझ्या हैराण ह्रदयाच्या चोरा
दाखव तुझा पिसारा !
दिवसाची चांदणी मी
प्रेमात नाचते तुझ्या !
सख्या  रे आज फुलले
मी बहरले मी !
जिवनाच्या गंधात वाहाते मी !
बेभान आज मि झाले, माझे मला कळेना !!
         

  !! माझ्या मैत्रिणीच्या मिञा साठी !!
         विराट शिंदे (9673797996)

आठवण

क्षणभंगूर जिवनाच्या
वाटेवरची साथ  तू
कधी तळ्यातली
कधी मळ्यातली
आठवणीतून
माझी साथ  तू

-  विराट शिंदे  9673797996

आग क्रांतीची ती..

तेज तर्रार तलवार तळपता
भल्या भल्यांना घाम सुटतो
नाद ऐकुनी हर हर महादेव
सह्याद्री ही झुकतो वाकतो
शिव शंभू चि शौर्य गाथा
उभ्या जगाला वेड लावते
लढली दोन शस्त्रे या  मातित
तळपती  तलवार अण  पेन
जाण ऊपकार मराठ्या या मातिचे
राहुदे रग तुझ्यात जागती
पेटुदे आग  क्रांतीची ती

   -विराट शिंदे

जयस्तू

आभिमान असे मराठा असल्याचा
गर्व वाटे या लाल मातीचा
स्वाभिमान माझ्यात स्वराज्याचा
जिव ओततो शिवरायां चरणी
रग माझ्यात शंभू राजांची
देव भाव पंढरीचा पांडुरंग
गगनचुंबी स्वप्न आमूचे
मावळे आम्ही शिवशाहीचे. ..

- विराट शिंदे

भामटे हे जग

भामटे हे जग सारे
का मला असे वाटते !!

जगण्याचा गंध सारा
उकिरड्या परी साचतो
प्रेमावर नाही भरवसा
विश्वास तरी ठेऊ कसा
याच गोंधळी जिव वेडा पिसा !!

का मला असे वाटते
भामटे हे जग सारे !!

कुठे हरवला शिवशाहीचा वारसा
याच डोळा याच देही तुकोबांचा
विचार बोलताना दिसत नाही कसा
ओसाड उजाड या जगण्याचा
आज वाटतो भार सारा
आज नाही राहीला जिवना मागे सार
म्हणून मरूण का त्कारू हार !!

का मला असे वाटते
भामटे हे जग सारे !!

पिसाळलेल्या या जगाचा
कोण करील उध्दार रे
सांगा कोणी मिळेल का ?
पुन्हा या जगाला बुध्द
वा मानवतेची मिसाल तो
शिवबा परी राजा !!

का मला असे वाटते
भामटे हे जग सारे !!

✒विराट शिंदे  9673797996

Monday, 1 February 2016

प्रेम प्रेमच असतं

प्रेम ते आसत जे
मनाल मनापर्यंत नेत
प्रेम ते आसत जे
जगण्याला अनंदी करत
प्रेम ते आसत जे
माणसाला माणसापर्यंत जोडत
प्रेम ते आसत जे
जगण्याचा अर्थ सांगत
प्रेम ते आसत जे
जिवाला जिव लावत
प्रेम तेच आसत जे
जे ह्रदया तुण ह्रदया पर्यंत आसत
प्रेम ना व्याख्येत बसत
आणि कोणीही सांगत
ते कस आसत
प्रेम प्रेमच आसत
तुमच्या साठीही व
माझ्या साठीही
सेमच आसत
खरच प्रेम प्रेमच आसत.

विराट शिंदे-9673797996

ऐ ऐ ऐ आवाज चढवू नका

हे कणखर भारत देशा

जय रौद्र शंभू

ज्यांच्या पराक्रमाचा पाढा
बघाव आणि बस बघतच राहावा
ईतका ओजस्वी,
जगही वाकल पाहून त्यांची महती
विचार करा त्याच छत्रपतींची काय आसेल ख्याती..
आजुनही लाल आहे या महाराष्ट्राची माती
गड किल्ले बोलत आहेत
शिव-शंभू ची किर्ती
महाराष्ट्राच्या ज्वलंत मातीत
जाज्वल्य आसा जिवंत इतिहासा घडवला. त्या शंभू छत्रपती ना मानाचा मुजरा....
✒ विराट शिंदे 9673797996

मातीतील प्रेरणा

मातीतील प्रेरणा...  या संकल्पनेवर आधारित एक छोटास काव्य वाचकांस सादर करतोय. आवडल्यास नक्की शेअर करा..
विराट शिंदे - 9673797996

नको आम्हाला प्रेरणा जातीची
प्रेरणा हवी आहे आम्हा मातीची
शपथ घेऊन सांगतो तुम्हाला
गरज आहे मावळ्यांच्या साथीची

माणुसकीचा शोध कठीण झालाय
ईथे माणसाच्या रक्ताचा पुर वाहलाय
आसुसले भुमंडल सारे आण
रागावलेत म्हणे सारे ग्रह तारे

का रे माणसा चुकतोस तू
योग्य ठिकाणीच का हुकतोस तू
अल्पशा गोष्टीं करीता
मायाजालात फसतोस तू

इतिहासाची पाने चाळून घे
विचारांचा ठेवा मिळेल
महापुरुषांच्या प्ररणादाई
उजेडाचा मार्ग कळेल

जातीसाठी लढनारे झालेत षंढ
मर्दा उठ आता पुकार मातीसाठी बंड
मनुच्या छायेत गडी झालाय थंड
मातीतील प्रेरणेनेच गडी पुकारेल बंड

जातीसाठी तुम्ही नका खाऊ माती
मातीतील प्रेरणेनेच उजळतील जिवन ज्योती
निरखा तुम्ही महापुरुषांची ख्याती
कळेल काय किंमती आसते माती

  ✒ विराट शिंदे 9673797996

चारोळी

शंभु शौर्य गाथा

विर पराक्रमी अन धुरंदर
अतुट शौर्याचा ठेवा

शुरविर तो संस्कृत पंडीत
सह्याद्रिचा छावा

#विराट

चारोळी

शंभु शौर्य गाथा

सौंदर्याचा धनी शिकवतो
प्रयत्नवादाचा धडा

शिव-शंभू चरित्र वाचुन
तुम्ही आता तरी घडा

#विराट

चारोळी

आजही लाल आहे
तुळापूरची माती ||
या पहावया एकदा
शंभू राजांची ख्याती ||

#विराट

चारोळी

आरे शब्दही जिथे थिटे पडतात
आशी शंभू राजेंची महती ||

लेखनी चालवली त्यांनी
एकदा वाचून पाहा त्यांची ख्याती ||

#विराट

चारोळी


आजही रक्त उसळते
ज्यांचे नाव घेता
विचार करा त्यांचा
राज्याभिषेक कसा होता.

#विराट

चारोळी


आजही रक्त उसळते
ज्यांचे नाव घेता
विचार करा त्यांचा
राज्याभिषेक कसा होता.

#विराट

चारोळी

ज्या मातीत शौर्याच पिक ऊगवत
ती माती पहायला या
माझ्या शंभु राजांची
ख्याती पहायला या...

#विराट

चारोळी

शंभु शौर्य गाथा

पुजतो आम्ही रोज
शिव-शंभुंच्या नावा

विचार करा काय आसेल
त्यांच्या कार्याचा ठेवा..

#विराट

चारोळी

शंभु शौर्य गाथा

अजिंक्य होता अजिंक्यच
राहिला शंभू छत्रपती

आजही उसळते रक्त ऐकता
त्यांच्या कार्याची महती

#विराट

चारोळी

शंभु शौर्य गाथा

स्वराज्याचा विस्तार होता
शंभू छत्रपतींचा ध्यास

ऐका तुम्ही लोकांनो जगा
करतोय इतिहास

चारोळी

शंभु शौर्य गाथा

निखळ होते चारित्र्य ज्याचे
तिथे का घुसवली गोदावरी

चिटनीसा तुझी मजाल एवढी
लपवली तु शंभूंची ओळख खरी

#विराट

चारोळी

शंभु शौर्य गाथा

निखळ होते चारित्र्य ज्याचे
तिथे का घुसवली गोदावरी

चिटनीसा तुझी मजाल एवढी
लपवली तु शंभूंची ओळख खरी

#विराट

चारोळी

राज्यभिषेक

गगनालाही भिडावा
आसा तो रायगड बांधुन
शिवबांनी घडवली उज्वल
आशी किर्ती,

6 जुन ला चला पाहण्या
सिंहासनावर विराजमान
शिव छत्रपतींची  मुर्ती....

#विराट

चारोळी

शंभु शौर्य गाथा

सौंदर्याचा धनी शिकवतो
प्रयत्नवादाचा धडा

शिव-शंभू चरित्र वाचुन
तुम्ही आता तरी घडा

Virat shinde

प्रेरणा आम्हा मातीची

शिवरायांचे मावळे आम्ही,
प्रेरणा आम्हा मातीची
फिकीर कशाला करता राव
आमच्या मर्दानी छातीची....

भिडू अन्यायाला सारे
हिच किमया आमच्या ख्यातींची
शिवपुत्राची बुद्धीतेजाने झळकते आवनी
अशी पुण्याई आमच्या मातीची

-विराट शिंदे...9673797996

छावा

झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता

झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षणकरण्यासाठी  देह त्याने वाहीला

जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मुजरा आशा त्या शुंभु छत्रपतींना...

-विराट शिंदे