Sunday, 18 October 2015

ध्येय शिखर

-○-ध्येय शिखर-○-

सतत धडपडत राहणे
प्रत्येकाचा पेशा असावा
मेहनतीच्या जिवावर आपला
उद्याचा चेहरा स्पष्ट दिसावा

दुख भरपूर आसतील पण
रोज थोड रूसाव जास्तीच हसाव
हसता हसता आपल्या अस्तित्वासाठी
स्पर्धेच्या भानगडीत फसाव

अडथळे असतात फार
मन कचदिल नसाव
रोज चालता चालता
ध्येयाच गाव दिसाव

दुष्ट संकटांना झेलण्यासाठी
अत्ता आपण कंबर कसाव
ध्येयाची लढाई लढता लढता
ध्येयाच्या शिखरावर बसाव

✒विराट शिंदे (9673797996)

Friday, 16 October 2015

प्रेम कळी तू

प्रेम कळी तु नाजूक साजूक
नाते तुजशी जुळले
या उनाड दुनये मध्ये
बहार तुझ्यात दिसले
तुझेच स्वप्न तुझ्याच गोष्टी
प्रये तुझा लागला लळा
तुज पाहता प्रिये
हर्ष मनाला वाटे ||

प्रेम कळी तु नाजूक साजूक
नाते तुजशी जुळले
दरळला प्रेमगंध चहूकडे
हिरवळली ग ओसाड राणे
तुझ्या प्रितीचे गातो गाणे
सखेग साजनी
माझी प्रित तुझ्याशी जुळली
कधी हासवा तर कधी रूसवा
कधी आठवणीचा गोडवा
हे प्रेम कि भावना
काही कळेना मला ||

✒ विराट शिंदे ( 9673797996 )

माझे गुरू

माझ्या जिवनात आमुलाग्र बदल घडवणार्‍या प्रत्येक मानवास शतशः नमन...

◇◇ माझा गुरू ◇◇

गुरू मज धरती
गुरू मज आंबर
मज लाभले गुरू शंभर ||

गुरू मज माता
गुरू मज पिता
गुरू मज भ्राता
गुरू मज आम्हा मानवांचा त्राता ||

गुरू मझे थोर
गुरू माझे धंनी
गुरू माझे आहेत
तोकोबा सारीखे ज्ञानी ||

गुरू पाशी ज्ञान
ज्ञाना पाशी भान
गुरू माझा आहे
सर्वांहुनी महान ||

सदा माझे डोळा
गुरूचीच मुर्ती
काय वर्णावी
माझ्या गुरूंची किर्ती

गुरू माझे शिवबा
गुरू माझे फुले
गुरू माझे शाहू,
आंबेडकर झाले ||

   - विराट शिंदे 9673797996

जिना ईसीका नाम है.

समंदर की लहरों से कभी
दोस्ती नही होती,
ईनसानीयत कभी
जात धर्म नाही देखती,
जिंदगी एक दर्या है
जिसमे हम कुद चुके है,
हर हाल में तैरणा है
हैराणी की कोई बात नही होती,
मुस्कीले आती रहेंगी
ठोकरे मिलती रहेंगी,
ये जिंदगी है दोस्तो
हर हाल मे जिकर रहेंगी,
गैराही ना नापते बैठो
कछवा तुम्हे हरायेगा,
जित के रास्तोंपे चलतेही
आंधेरा सामने आयेगा,
रोशणी की और दौडते दौडते
आंधेरेको भुल जायेगा,
जिना ईसीका नाम है
जिंदगी का मजा आयेगा,
इंसानीयत से जिना सिखो
तो ऐ समंरभी कुछ न कर पायेगा..

-○- विराट शिंदे -○-

मी जे जगलो...

देव देव करत करत
झालो होतो आतुन काळा

नातेवाईक मित्रांशी कधीच
नव्हता जिव्हाळा

जिवन कधी कळलेच नाव्हते विचारांन उमजला सारा घोटाळा

माणूस असुन नव्हता
माणसाचा कणवळा

कारण देव देव करता
करता झालो होतो डोळे
असुन भित अंधाळा

अशाच एका वाटेवर
माणूस भेटला भला


ज्याच्या मुळे लागला
शिव शाहु फुले आंबेडकरी
विचारांचा लळा

ह्या विचारानी आला
नात्या मध्ये ओलावा

अत्ता वाटते कि
जगण्याला लय आला,
जगण्यासाठी
उद्देश मिळाला

धन्यवाद राहुल
मकरंद सर तुमच्या
मुळे जगण्याचा
अर्थ कळाला

       -मनोज गायकवाड

स्वाभिमानी

जगण्याचाच वाटतो भार
म्हणे तुलादेतो आधार
आर लेका कशाल मारतो बोंब
स्वबळी मातीतुन उगवती कोंब

माझीया हात बळकटी हाय
काटीच्या आधाराच बुजगावनं न्हाय
दिनरातच कष्ट करील पर
लाचारीचा मुडदा न्हाय

अरे बाबा शिवरायांचा स्वाभिमान
आमच्या रक्तात हाय
शुन्यातुन विश्व कस होत
हे आम्हा ठावं हाय

राजबिंडे आम्ही मर्द
नामर्दीची चाड न्हाय
गुलामीचे जिण आमच्या
कधीच पायदळी गेलयं

कितीही आले गणिम तरी
लढाऊ आमचा बाणा
हारनार न्हाय पाहुन फौजा
फौजेलाही ललकारी राणा

समजुन घेरे भाबड्या
उगाच नकोरे तुझा आधार
मनगट निर्भीड हाय आमच
शिवधर्मी रं आम्ही माणसं

  ✒कवी विराट शिंदे
         9673797996

प्रेम प्रेम आसत तरी काय

प्रेम ते आसत जे
मनाल मनापर्यंत नेत
प्रेम ते आसत जे
जगण्याला अनंदी करत
प्रेम ते आसत जे
माणसाला माणसापर्यंत जोडत
प्रेम ते आसत जे
जगण्याचा अर्थ सांगत
प्रेम ते आसत जे
जिवाला जिव लावत
प्रेम तेच आसत जे
जे ह्रदया तुण ह्रदया पर्यंत आसत
प्रेम ना व्याख्येत बसत
आणि कोणीही सांगत
ते कस आसत
प्रेम प्रेमच आसत
तुमच्या साठीही व
माझ्या साठीही
सेमच आसत
खरच प्रेम प्रेमच आसत.

विराट शिंदे-9673797996

आई तुझा लाल...

आई तुझा लाल ईमानीने जगतोय
तुझ्या शिकवणीन माणुसकीन वागतोय ||

              तहानतो भागतो पण
              विश्वासाने वागतो
              जगामध्ये मि आता
              आनंदाने जगतो |

आई तुझा लाल ईमानीने जगतोय
तुझ्या शिकवणीन माणुसकीन वागतोय ||

              मानुसपणान रोज
              एक माणूस जोडतो
               प्रेमानेच त्यांची
               मी खोड मोडतो |

आई तुझा लाल ईमानीने जगतोय
तुझ्या शिकवणीन माणुसकीन वागतोय ||

              शिवरायांचा विचार
              जगा समोर मांडतो
              अमानवते विरोधात
              रोज एकदा भांडतो |

आई तुझा लाल ईमानीने जगतोय
तुझ्या शिकवणीन माणुसकीन वागतोय ||

               वडीलधार्यांच्या रोज
               मदतीला पडतो
               आडतो नडतो पण
               ठेचांखाऊनच घडतो

आई तुझा लाल ईमानीने जगतोय
तुझ्या शिकवणीन माणुसकीन वागतोय ||
                
      ✒ विराट शिंदे
            (9673797996)

एकतरी स्वप्न असाव..

आयुष्यात एक तरी
स्वप्न आसाव
ते स्वप्न दिवसाही
एकदा दिसाव
स्वप्ना साठी लढन्याची
जिद्द आसावी
त्या जिद्दीने स्वप्नाची
दिशा दिसावी
दिशेने चालता चालता
ठेचा  आसाव्यात
ठेचा खात खात चालण्याच्या
आशा दिसाव्यात
आनुभवाचे बोल घेत मार्ग
चालावा जपून
गड जिंकन्या साठी संकट
टाकवी कापुन
सुसाट वादळालाही बेभान
चिरीत जाव
लक्षात ठेवाव फक्त
स्वनातलच गाव
तो दिवस उजडेल स्वप्नाचा
प्रकाश पाहण्या
सार जग येईल तुम्हा
बक्षिस देण्या

✒विराट शिंदे (9673797996)

विजेता

सतत धडपडत राहनारा
या जगात विजेता आसतो
सुर्य चंद्रा प्रमाणेच
तो तेजस्वी तारा दिसतो

पंख त्याचे उडण्यासाठी
बेचैन असतात
उंच भरारी घेणारेच
आकाशात दिसतात

स्वप्नांसाठी लढणारा
तो विर योध्दाच असतो
क्षणात बाजी मारनाराच
यश शिखरावर दिसतो

मेहनती पेशाचा
तो कष्टकरी आसतो
जिध्द आणि चिकाटीतून
तो प्रेरीत दिसतो

स्वयं प्रेरणेतून
तो प्रेरीत भासतो
जग जिंकनारा तो
एक विजेता आसतो

✒ विराट शिंदे

छावा

झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता

झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षणकरण्यासाठी  देह त्याने वाहीला

जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मुजरा आशा त्या शुंभु छत्रपतींना...

- विराट शिंदे

अच्छे दिन ना आयेंगे


मोदिजी लोकांना तुम्ही
किती तरी वादे केले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता अच्छे दिन आले

एक वर्ष सरूनही कसे
काहीच नाही झाले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता आच्छे दिन आले

केंद्रा सारखेच राज्यतही
दुष्काळा सोबत संकट आले
कधी म्हणावं आम्ही
आत्ता आच्छे दिन आले

शिवरायांची बदनामी करनारे
शिवद्रोही महाराष्ट्र भूषण झाले
यालाच म्हणाव का आम्ही
आत्ता आच्छे दिन आले

✒शिवप्रेमी विराट शिंदे

चारोळी

#दुष्काळी_कळा

शेता मंधी माझी माय
करित असे खुरपणी
खुरप्याचा घाव नको
पिक मागत असे पाणी

-विराट शिंदे

माझ्या मना...

माझ्या मना रं तू
घे जगण्याचा ठाव रं
अंधाराला सोडून तू
उजेडाकडे धाव रं   ||

मेहनत नावाच
आपल आहे गाव रं
नशिबाचे दोर तोडून
जगा बरोबर धाव रं  ||

कष्टाला फळ आहे
सोस जरा तू घाव रं
स्पर्धेत जर जिंकलास
तरच प्रगतीला वाव रं  ||

तत्वज्ञानातूनच मिळेल
जगण्याचा ठाव रं
ज्ञानाचा आविष्कारानं होईल
इतिहासात नाव रं    ||

आजच हे खुळ सोडून
मानवतेशी नात जोडा
उच्च-निच्चता सोडून
त्याला समते मध्ये मोडा  ||

      ✒कवी - विराट शिंदे
9673797996

Tuesday, 13 October 2015

जाग मराठी मना जाग

जाग मराठी मना जाग
हि साद देतोय छावा !!
लाले लाल माती इथली
लाले लाल इंद्रायणी
कहर झालाय या मातीवर
करतोस तुकाय वावा !!
ओरडून सांगते वढू-तुळापूर
रक्त रंजीत हा पाडवा
स्वराज्याच्या वारसदाराचा
हा अपमान हा पाडवा
कसा गिळू मि या घासातील गोडवा !!

जाग मराठी मना जाग
हि साद देतोय छावा !!
आपशकूनी तो पालथा कलश
हिरमुसली ति आंगनातील तुळस
ओस पडल्या रांगोळी
सुन्न झाले घरदार
स्वराज्याचे मिठ खानारा
निघाला गद्दार
सांग मराठ्यां कुठे हरवलास तुझा मराठी बाणा !!

विचार त्या इंद्रायणला
शौर्य माझ्या शंभू चे
करून साजरा पाडवा
करतोस शंभुराजे चा अपमान गाढवा !!
शिवरायांची शपथ तुला
आठवण कर शंभू बलिदानाची
जाग मराठी मना जाग
हि साद देतोय छावा !!

    -विराट शिंदे (9673797996)

शिक्षणाचे बाजारीकरण....

शिकलोरे बाबा शिकलो
शिक्षण घेऊ घेऊ वाकलो
नौकरी च्या मायचा पत्ता नाही
डिर्ग्यांचेच गाठोडे घेऊन थकलो ||

खुप खुप कॉलेजात शिकलो
गुरजीं कडुन शाहानपण शिकलो
गाणितही मि एक नंबर शिकलो
तरीही हाल माझे आता मि पकलो ||

मि जिवनाला रंग दिला होता
जगन्याला ढंग दिला होता
शिक्षणाने माझ्या स्वप्नांचा भंग केला
आस वाटतयं माझाच आभंग झाला ||

दोष नाही माय-बापाचा
दोष नाही गुरजींचा
शिकवनी पालनपोषण योग्य
दोष आहे या सिस्टीमचा ||

सरकारची नामुष्की
आण नोकरीचा रूसवा
पाहुन आसच वाटतय
शिक्षणाचाच खेळ फसवा ||

दाहावी नापास मंत्री आणं
त्यान शिक्षणाची केली संत्री
आता काय करवं म्या तरी
फुलेंचे शिक्षण राहीलं नाही उरी ||

मिटली जरी शिक्षणाची दरी
शिक्षणानं दार बंद केली खरी
काय करावं कळानास झालय
शिक्षणानही काहीच वळणास झालय ||

माफकरा फुले साहेबं
चोरटाच झालाय शिक्षणाचा आधीपती
तुम्ही आयुष्य घातल  शिक्षणासाठी
त्याच श्रेय चोरट्यांच्याच ताटी ||

मनुवादात सुरंग पेरून
शिक्षणाच रोपट लावल
फुले सहेबं तुमच्या क्रांतीला तोड नाही
माझा मुजरा तुमच्या ठायी ||

✒ विराट शिंदे...(9673797996)

मनधुंद

मन धुंद पाखरांनी
स्वछंदी सैर घ्यावा
गुमनाम या मनाचा
बिनधास्त शोध घ्यावा ||

मद मस्त बाहु ज्याची
बलदंड विर व्हावे
अन धुंद या विजेचा
मन धुंद बोध घ्यावा ||

अवनी प्रेरीत व्हावी
ऐसा शुर-विर व्हावा
शिवबा परी नृप
या जगती पुन्हा व्हावा ||

रण कंद फुंकताना
मणुस होऊन पहावे
स्वयं प्रेरीत रहावे
जगाला प्रेरीत करावे ||

स्वछंदात जगताना या
जिवनात सुंदर बगीचा फुलावी
तेजःपुंज यश शिखरावर
गरूड झेप घ्यावी ||

मन धुंद पाखरांनो
मध मस्त झेप घ्यारे
दिवा स्वप्नास तुम्ही
पुर्तीस घेऊन जारे ||

✒विराट शिंदे (9673797996)

सुधारता सुधारता हयात गेली

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

धर्मा धर्मात वाद चढवले
गुलामगीरीचे काळोख ओढले
रूंदावली दरी गरिब-श्रिमंतीची
म्हणे हा बांडगूळ शुद्र आम्हा ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

बहुजन उपाशी पंथ तुपाशी
हा कसलारे न्याय तुझा
दगडाच तु देव झाला
काय बोलेल तुझी वाचा ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

शतजन्माचे बळीवंशज आम्ही
शिव दान हा धर्म आमुचा
सर्व लुटले चाटले भिकार्याने
तरीही म्हणतो यज्ञा तुंप लागे ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

भाईबंद आप्त आमूचे
शोषणाने कुपोषित केले
शेंडी वाल्यांना ढेरगे सुटले
सरकारबी त्यांच्या खिशात बसले||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही ||

काय रे देवा तुझा न्याय
तुझ्याच मंदिरात घोळ हाय
सगळे ईथे भ्रष्ट आण
सारा भ्रष्टाचारच हाय ||

सुधारता सुधारता हायात गेली
तरी न कळला घोळ काही
आता एवढीच विनंती हाय
माणुसकी साठी जगुन पहाय ||

✒लिखाण- विराट शिंदे...
                   (9673797996)
दि.-31/08/14

Monday, 12 October 2015

पुरोगामी महाराष्ट्र

महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे
छाती ठोकून सांगतो मी
शिव, शाहु, फुले, आंबेडकरी
विचार घ्या हेच भिक मागतो मी  ||

रामदासी लिला अभासी
काय त्यांचे सोंग रे
जिव ना भाव तेथे
दगड त्यांची प्रेरणा म्हणे ||

जाणून का अंजान रे
महाराष्ट्राचा पुरोगामी पणा
काय आमचे चुकले रे
दाखवतोस एवढा मोठा फणा ||

महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे
छाती ठोकून सांगतो मी
पाठित तुम्ही केलात वार
नामर्दांनो तुमची यातच हार ||

कर्मठांनो जे झाले ते झाले
आत्ता किती उगवनार सुड
राज्यघटना संपवन्या मागे
काय आहे रे गुढ ||

शोध घेतोय तुमच्या रक्तात
पाणी का भरलयं
सांगा तुम्हीच या घडीला
माणूसकीला कुठं पुरलयं ||

आसलं हे खुळ सोडा
मानुसकीसी नात जोडा
उच-निचता सोडून
त्याला समते मध्ये मोडा ||

✒विराट शिंदे (9673797996)

नविन वर्षाच्या शुभेच्छा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लिहिलेले कवन..

एक जग आहे
सुंदर आहे
नटलेल आहे
थाटलेल आहे
बहरून जान्यासाठी
हटलेल आहे
ईथे जगण्याचा खेळ आहे
मानवतेचा मेळ आहे
उत्साहात उत्कंठा आहे
जगण्यासाठी धडपड आहे
खुप माणुसकी सोबत
थोडी आशाही आहे
प्रत्येक माणूस
शोधतोय रस्ता
हसता हसता
सुखाचा आनंदचा
आण समृद्धीचा
दिशा न दिशा
तळपत राहतील
एवढ सार कष्ट करू
एवढी आहे सदिच्छा
आपल्या सर्वांणा नवीन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला स्नेहांकीत विराट शिंदे
मो. - 9673797996

माँसाहेब आम्हाला माफ करा

माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शिवेच्छा....
जन्मोत्सवाच्या निमित्ताने सादर....

माँसाहेब आम्हाला माफ करा
या महाराष्ट्राला लागलाय दुर्दैवी शाप खरा
ईथे फक्त वाहतोय वादळी वारा
आण प्रत्येक पावसा सोबत पडतात निर्दयी गारा

माँसहेब आपण गुलामगिरीला तडा दिला
आंधारलेल्या समाजाला स्वराज्याचा धडा दिला
आज त्याच मातित जातोय तडा
कुठेही शिवराय होत नाही खडा

माँसाहेब  माणुसकीला लागलीय आग
चहूकडे माजलीया फक्त भागमभाग
सगळेच स्वतःला म्हणतात वाघ
पण पाहीलंच खर तर हे सगळेच आहेत नाग

माँसाहेब आपण तर रणरागीनी होता
पण आज घर घर की कहानी पूरताच आहे गोता
सासू सुनांचा मेळ बसना काय सांगू आता
सगळी कडे घडतात रामयण अण महाभारताच्याच कथा

माँसाहेब आपण खुप ग्रेट आहात
या राष्ट्राला मिळालेली अनमोल भेट आहात
भल्या भल्यांसाठी आपण चेक मेट आहात
खरच स्वराज्यासाठी आपण दिव्य भेट आहात

माँसाहेब  आपल्या मात्रत्वाला तोड नाही
घडवले शिव-शंभू त्यांच्या सारखा जगात जोड नाही
आज पुन्हा एकदा सुसाट सुटलय वादळ
या वादळाला रोखनारा स्वराज्याचा तारा नाही

माँसाहेब महाराष्ट्राची खंत तरी सांगावी काय
बळीराजाच उपाशी त्याला भिक सुद्धा मिळत न्हाय
आत्महत्या शिवाय त्याला सुचनार तरी काय
रोज उपाशी राहत आसेल जर त्याचीच माय

माँसाहेब आपण समतेची शिकवण दिली
पण खंत एवढीच ईथे जातीयत्ता रूढ झाली
इथली शांती इथली कधीच भंग झाली
आत्ता ईथे कुणीच नाही कुनाचा वाली

माँसाहेब याच पुरोगामी महाराष्ट्राला घडवल आपण
पुर्ण केल आपल स्वराज्याच सपणं
पण पुरोगामी पणाचा कधीच लिलाव झाला
महाराष्ट्राच्या समतेला कधीच तडा गेला

माँसाहेब आता एवढीच आशा करतो
उरलेल्या माणुसकीला प्रतेक मस्तकात पेरतो
समतेची शिकवण घेऊन प्रतेकाला घेरतो
स्वराज्याची प्रेरणा प्रतेक मना मनात भरतो

माँसाहेब लढण्यासाठी बळ मागतो
मानसाला माणुस म्हणुन शिकऊन बघतो
जमेल तिथे आपल्या संस्काराचे मोल सांगतो
माणसं बदलण्यासाठी फक्त एवढच भिक मागतो....

    ✒ विराट शिंदे (9673797996)

बा तुला काय सांगू...

समाजातील काही सत्य आंगाला दर्शवनारी हि कविता
कुणाच्या विरोधासाठी नाही. पण झोपलेल्या प्रत्येक बापासाठी नक्कीच आहे.
विराट शिंदे 9673797996

बा तुला काय सांगू
माझ्या देशाची अवस्था तंग
गरिबाचे होतात बेहाल 
बामण दक्षणेने झालाय पंग
कलम कसायाच्या औलादी
झालाय दहशतवादी संघ

बा तुला काय सांगू
आमच्या इतिहासाची चाल
लेखनीचे शस्त्र वापरून
बहुजनांना केलय बेहाल
ईथे पंथ तुपाशी आहे
तर बहुजन उपाशी आहे

बा तुला काय सांगू
ईथल्या द्रोणाचार्यांची चाल
उजव्या हाताचा अंगठा तोडुन
करतोय एकलव्याचे बेहाल
कपटाचा कळस रचलाय
मनूच्या क्रुर लेखनीन

बा तुला काय सांगू
संत महात्म्यांच्या कथा
क्षमा, शांती, दया शिकवली
बडव्यांची हरामी झुकवली
समतेचा संदेश देत
त्यांनी आपुलकी टिकवली

बा तुला काय सांगू
पंजा नंतर छक्के आले
उद्योगपतीच्या घरामध्ये
यांचे इमान विकल्या गेले
चौमुलखाच्या छत्रपतीचा
आपमान ज्याने केला
त्या निच मानसाला
यांनी गुरू म्हणून स्वीकारला

बा तुला काय सांगू
या तिन टक्क्यांचा खेळ
त्यांच्या सोबत कितीही जोडला मेळ
तरी निच औलादी करतातच घोळ

     ✒विराट शिंदे
    ��9673797996

गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ????

गुरूजी तुम्ही खुप काही शिकवल
शिकवता शिकवता आमच डोक पिकवल
पण आता हे काळ शिवार एकदा पिकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

आता तर आठवी पर्यंत पासच होणार
'ढ' नावाचा प्रकार विस्मृतीत जाणार
जहाज कोणत्यातरी काठाला नेऊन टेकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

गुणवत्तेचा प्रश्न आत्ता उरलाच नाही
स्पध्येत कोणी हरलाच नाही
आसला का आलाय प्रशासनाला लकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

बेरोजगार आणि शिकलेले आज्ञानी
यांची संख्या खुप झाली आहे
त्या सर्वांचे अस्तीत्व टिकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

जातीयवाद आण दंगली खुप झाल्या
आता सर्वांना समान लेखुन
समतेन भरलेल रान पिकवा
गुरूजी जगण्याची लढाई शिकवा ?

  ✒ विराट शिंदे
  �� 9673797996

नको आम्हाला प्रेरणा जातीची

मातीतील प्रेरणा...  या संकल्पनेवर आधारित एक छोटास काव्य वाचकांस सादर करतोय. आवडल्यास नक्की शेअर करा..
विराट शिंदे - 9673797996

नको आम्हाला प्रेरणा जातीची
प्रेरणा हवी आहे आम्हा मातीची
शपथ घेऊन सांगतो तुम्हाला
गरज आहे मावळ्यांच्या साथीची

माणुसकीचा शोध कठीण झालाय
ईथे माणसाच्या रक्ताचा पुर वाहलाय
आसुसले भुमंडल सारे आण
रागावलेत म्हणे सारे ग्रह तारे

का रे माणसा चुकतोस तू
योग्य ठिकाणीच का हुकतोस तू
अल्पशा गोष्टीं करीता
मायाजालात फसतोस तू

इतिहासाची पाने चाळून घे
विचारांचा ठेवा मिळेल
महापुरुषांच्या प्ररणादाई
उजेडाचा मार्ग कळेल

जातीसाठी लढनारे झालेत षंढ
मर्दा उठ आता पुकार मातीसाठी बंड
मनुच्या छायेत गडी झालाय थंड
मातीतील प्रेरणेनेच गडी पुकारेल बंड

जातीसाठी तुम्ही नका खाऊ माती
मातीतील प्रेरणेनेच उजळतील जिवन ज्योती
निरखा तुम्ही महापुरुषांची ख्याती
कळेल काय किंमती आसते माती

  ✒ विराट शिंदे
  ��9673797996

तु माय भू माझी

आवडल्यास नक्कीच शेअर करा व आपल्या अमुल्य आशा प्रतीक्रीया कळवा...
विराट शिंदे - 9673797996

तु माय भू माझी...

माय भू तुझे थोर उपकार
दिलासी महापुर विचारांचा
तुकारामांनी सांगितले थोरपणा
जगण्यासाठी ठेवा ताठ कणा

नामदेवांनी मंत्र दिधला थोर
'ज्ञानदीप लावू जगी' गर्जला शोर
झोपलेल्या समाजाचा संपवला घोर
धन्य धन्य नामदेव गर्जे लहान थोर

माय भू तु आम्हा प्रेरीका गं
दिधलासी छत्रपती शिवबां सारखा गं
पिडीतांचे कष्ट केले सारे नष्ट
आन्यायाला न्यायानेच केले त्यांनी संतुष्ट

माय भू तुझे आनंत उपकार
भयमुक्त केलास तू सारा संसार
करून मनुस्मृतीचा दाह संहार
बाबासाहेबांनी केले भटांनाही महार

माय भू तु ग न्याय गंगा आहे
महामानवांना जन्म देऊन
समतेचा न्याय सर्वांना देऊ पाहे
तृप्त होई जनसागर तुझ्या आसर्याने

  ✒ विराट शिंदे
  �� 9673797996

हिंदू आम्ही मुस्लिम तुम्ही

हिंदु आम्ही मुस्लिम तुम्ही...


हिंदु आम्ही मुस्लिम तुम्ही
असा नका करू रे वाद
या वादानेच केलाय
देश आमचा हा बरबाद

राम आमचा अल्लाह तुमचा
मग माणूस आहे हा कोणाचा
या वादासाठी केलास की रे
घात स्वतःच्या भावाचा

तुला बाप नाही ना भाऊ नाही
अरे वेश्येची औलाद
खुर्चीसाठी केलास की रे
माणूसकीचा घात

जातीचे आणि पातीचे
येथे पेरलेस तू बीज
माणुसकी विसरताना तुला
कशी नाही वाटली रे लाज

हा बौद्धाचा तो ख्रिश्चनाचा
म्हणतो आपण आहोत हिंदूचे
म्हणतो नका जाऊ त्यांच्याकडे
ते नागवे देव जैनांचे

हा आपला तो तुपला
म्हणोनी द्वेष करिता धर्माचा
त्यांनीच तर घातला आहे
कि पाया माणुसकीचा
म्हणतो बुध्द महावीर हे

नव्हते ते आपुले
मग तुच सांग राज्य
कोणासाठी सोडीले

नसतील तुझे ते
असलेले आमचे महापुरुष
मानवतेसाठी ज्यांनी वेचले
त्यांचे संपुर्ण आयुष्.

जातिवाद्यांनी केला
हा माणूसकीचा नास
रोज एच बदनाम होतात
आमचे महापुरुष..

लेखान:- नारायण लोभे (आध्यक्ष)
वारकरी शिवरायांचे धारकरी परिषद