#दिर्घ_काव्य...
#सन्मान_19_फेब्रुवारीचा
होय, शिवचरित्र जगाच्या ईतिहासातील
सर्वोत्तम सोनेरी पान आहे
जगामध्ये शिवरायांच्या शिवनितीला
अव्वल स्थान आहे
तेच शिवराय
आम्हा युवकांची जान आहे
मावळ्यांच्या शौर्याची प्रेरणा
आमच्या स्फूर्तीच स्थान आहे
मर्दानगी झळकते ज्या ईतिहासांच्या पानांतून
ती आमची शान आहे..
शिवरायांचे करू सोहळे
याचा गर्वच नाही तर अभिमान आहे
होय, शिवचरित्र जगाच्या इतिहासातील
सर्वोत्तम सोनेरी पान आहे
मनवतेचा जिथे होता रहिवास
त्या स्वराज्याचा आम्हाला अभिमान आहे
रोज घेतो शिवनीतीचे धडे म्हणून
आमच्यात स्वभिमान आहे
माँसाहेबांच्या संस्काराने
आमचा ईतिहास महान आहे
शंभुराजे आम्हा पोरांच्या
ह्रदयाच स्थान आहे
याच आमच्या जिवंत ईतिहासातून
समतेचा सन्मान आहे
ज्याला त्याला ईथेच मिळाले स्वतंत्र्य आण स्वाभिमान
ही शिवचरित्राची शिकवण छान आहे
होय, शिवचरित्र जगाच्या ईतिहासातील
सर्वोत्तम सोनेरी पान आहे.....
-◇-कवी : ♈विराट शिंदे, 9673797996...
©कविता नक्कीच शेअर करा. पण त्यातून कविचे नाव मात्र वगळू नका..कळकळीची विनंती...