Wednesday, 20 January 2016

प्रयत्नांती यश...

आज फार कंटाळलो आहे ही
आपली पहिली हार  असते
आज नही नंतर कधीतरी
यातूनच आपली निष्क्रियता दिसते

आजच काम आजच करूयात
यातच खरे तारूण्य आसते
आनंदाने जगूयात सारे
मग तर वसुंधराही हसते

प्रयत्नवादाचे धडे घेऊयात
हाच मुक्तीचा मार्ग खरा
सारे मिळून मानवतावादी होऊया
असे हाची क्रांतीचा नारा...

---विराट शिंदे..  9673797996

No comments:

Post a Comment