हळूहळू तुमच आयुष्य संपायला सुरूवात झाली !!
जर तुम्ही प्रवास केला नाही,
जर तूम्ही वाचन केल नाही,
जर तुम्ही जिवनाचे सुर ऐकले नाही,
जर तुम्ही स्वतः ला प्रोत्साहन दिले नाही
तर हळूहळू तुमच आयुष्य संपायला सुरूवात झाली !!
जेंव्हा तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास मारला
जेंव्हा तुम्ही दुसर्याची मदत नाकारली
तेंव्हा हळूहळू तुमच आयुष्य संपायला सुरूवात झाली!!
जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालात
आणि रोजच त्याच रस्त्याने चाललात,
जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलायला तयार नसाल,
जर तुम्ही विविध रंग परीधान करत नसाल आणि अनोळखी माणसांशी बोलत नसाल
तर हळूहळू तुमच आयुष्य संपायला सुरूवात झाली !!
जर तुम्ही तुमच्या आवडींचा आणि त्यांच्या भावनांचा अनुभव घ्यायला टाळता;
त्यामुळे तुमचे डोळे चकाकले आसते
आणि तुमच्या ह्रदयाचे ठोके वाढले आसते.
तर हळूहळू तुमच आयुष्य संपायला सुरूवात झाली !!
जर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वा बद्दल आणि प्रेमा बद्दल संतुष्ट नसाल आणि तरीही आयुष्य बदलत नसाल,
जर तुम्ही अनिश्चित गोष्टी साठी धोका पत्करला नाही,
जर तुम्ही ध्येयाच्याही पुढे गेला नाहीत,
जर तुम्ही स्वतःस आयुष्यात एकदातरी शहानपाणाच्या सल्ल्या पासुन पळून जाण्याची अनुमती दिली नाही,
तर हळूहळू तुमच आयुष्य संपायला सुरूवात झाली !!
स्वतःवर आणि आयुष्यावर प्रेम करायला शिका. जिवन खुप सुंदर आहे.!!
कवी :- पाब्लो नेरूदा (स्पॅनिश, नोबेल 1971 )
अनुवाद :- विराट शिंदे
No comments:
Post a Comment