Monday, 22 August 2016

भाऊ

��������������
सार्‍या ग्रुपवर ज्यांची हवा आहे
तो भाऊ आम्हाला हवा आहे
त्यांच्या बुलेटची राईड नको
त्यांचा दमदार पणा हवा आहे !!

हेवेदावे आसतील खुप सारे पण
त्यांचा उमदे पणा हवा आहे
ज्याला जे समजले त्याने ते समजूदे
परीणामाची परवा न करणारा भाऊ हवा आहे !!

तो गंभीर नको कधीच पण
सदैव खंबीर हवा आहे
त्याच्या नेत्रत्वात हमेशा
एक नुर हवा आहे !!

नात्यातील ओलावा टीकवनारा
त्याचा मऊ स्वभाव हवा आहे
खरच सार्‍यांना सामावून घेणारा
आम्हाला तो एकच भाऊ हवा आहे !!

त्याला रडताना पहावणार नाही
तो आमच्यासाठी थोडासा हसरा हवा आहे
सुख दुखाच काय हो येतजात राहतील पण
भाऊ आम्हाला हसराच हवा आहे !!

*Wish you many many happy Birthday "Bhau"*

��������������
विराट शिंदे

No comments:

Post a Comment