Monday, 12 October 2015

साहेब तुम्ही ग्रेट आहात....

एक उज्ज्वल आशा राष्ट्र घडवण्याचे सामर्थ्य या मातीत पेरणारे व माझ्या सारख्या कित्येक भटकलेल्या युवकांना प्रेरणा देऊन योग्य दिशा देनार्या युगपुरुष पुरूषोत्तम खेडेकर साहेब. त्यांच्या विषयी माझ्या मनात निर्माण झालेली प्रतीमा मि या कवितेत उतरवली आहे.......वाचकांना नक्कीच आवडेल....
✒विराट शिंदे

साहेब तुम्ही ग्रेट आहात
या देशाला मिळालेली
अनमोल भेट आहात
मावळे घडवले सक्षम आपण
उडवायला मनुचे कावळे
मन मस्तक मेंदू सशक्त केला
आत्ता नसनार कोणीच बावळे

साहेब तुम्ही ग्रेट आहात
या देशाला मिळालेली
अनमोल भेट आहात....

मावळे घडवायला
तुम्ही कणखर आहात
समाज घडवायला
तुम्ही सक्षम आहात
साहेब तुम्ही ग्रेट आहात

घडवला इतिहास महापुरुषांनी
पण आज तो
विसरल्यासारख वागलो आम्ही
तुमच्या संस्काराचा प्याला
असा जोष घेऊन आला
तुमचा कणखर बाणाही
त्याचा शिल्लेदार झाला
इतिहासही तुम्ही
उजेडात आनला

वाटत साहेब आपण
खुप खुप जगाव
पुन्हा एकदा या मातीन
स्वराज्य बघाव

साहेब तुम्ही ग्रेट आहात
या देशाला मिळालेली
आनमोल भेट आहात....

✒ विराट शिंदे 9673797996
©कृपया कविता कविच्या नावा सोबत जशास तशी पुढे पाठवा. स्वतःचे नाव कवितेला वापरू नका...

No comments:

Post a Comment