जगण्याचाच वाटतो भार
म्हणे तुलादेतो आधार
आर लेका कशाल मारतो बोंब
स्वबळी मातीतुन उगवती कोंब
माझीया हात बळकटी हाय
काटीच्या आधाराच बुजगावनं न्हाय
दिनरातच कष्ट करील पर
लाचारीचा मुडदा न्हाय
अरे बाबा शिवरायांचा स्वाभिमान
आमच्या रक्तात हाय
शुन्यातुन विश्व कस होत
हे आम्हा ठावं हाय
राजबिंडे आम्ही मर्द
नामर्दीची चाड न्हाय
गुलामीचे जिण आमच्या
कधीच पायदळी गेलयं
कितीही आले गणिम तरी
लढाऊ आमचा बाणा
हारनार न्हाय पाहुन फौजा
फौजेलाही ललकारी राणा
समजुन घेरे भाबड्या
उगाच नकोरे तुझा आधार
मनगट निर्भीड हाय आमच
शिवधर्मी रं आम्ही माणसं
✒कवी विराट शिंदे
9673797996
No comments:
Post a Comment