Monday, 12 October 2015

गातो थोरवी पोशिंद्याची

बैल जुंपले नांगरा
करावया मशागत,
भर उन्हात हकारीतो
राजा सरज्याचीरे पात ||

माझा बाप शेतकरी
भर उन्हात कष्टकरी
नाही उन पावसाची जाण
धरती त्याचारे आहे प्राण ||

डौलदार पिक याव म्हणुन
जिव ओवाळून टाकी
मातीच जिवरे तुझा तरिही
का झेलतो कर्जाचा बोजा ||

राञं दिस एक करूनही
पिक भरवशाच नाही
दुखः त्याच्याच नशिबी
सुखाची त्याला ओढ नाही
||

जगवतो उभ्या जगाला
त्याच्या परी देव नाही
माझा बाप शेतकरी
सार्या व्यापाराचा हितकरी
||

त्याची किमयाच न्यारी
जगाचे जिवन त्याच्या उरी
गर्व आहे आम्ही पोरं त्याची
गातो थोरवी जगाच्या पोशिंद्याची ||

©✒विराट शिंदे
मो. 9673797996

No comments:

Post a Comment