Tuesday, 9 February 2016

कुठे हरवला माणसा....

कुठे हरवलास माणसा
का सहतोस अपमान असा
हे जग आहे तुज साठी
पण तुच ईथे दिसेनास

तुज विना हे विश्व सारे
मला काही पाहावेना
तूझाच सखा तूझाच सोबती
ईथे त्याला रहवेना

सांग मानसा कसे गावे म्या
या विश्वात तुला कुठे पाहावे म्या
का असा हरवलास
शोध तुझा होईना

थकलोय खुप शोधून मी
आता लाचारीने जगू कसा
कुठे हरवलास मानसा
का सहतोस अपमान असा !!

--विराट शिंद

No comments:

Post a Comment